आमच्याबद्दल

विश्वासाचा पाया, समृद्धीचा मार्ग — आपली पतसंस्था.

about image

अमृतवेल नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे.

"एक संस्था, अनेक स्वप्ने"
अमृतवेल पतसंस्था हि संस्था दि. १४ फेब्रुवारी १९९७ रोजी संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बबनराव दशरथ हांडे यांच्या नेतृत्वाखाली फळ व्यापारी वर्गाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन करण्यात आली. फळ व्यवसायाशी संबंधित व्यापारी, विक्रेते, लहान उद्योजक आणि सर्वसामान्य सभासदांना बचत, ठेवी, कर्ज सुविधा व आर्थिक मार्गदर्शन उपलब्ध करून देत संस्था सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीत सभासदांच्या गरजा ओळखून आधुनिक व सुरक्षित आर्थिक सेवा देण्याचा संस्थेचा कायम प्रयत्न राहिला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन करत आर्थिक शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि सहकार भावना जपत कार्य केले आहे. सभासदांचा विकास हाच संस्थेचा मुख्य उद्देश असून त्यांच्या प्रगतीतूनच संस्थेची प्रगती साध्य होत असल्याचा संस्थेला विश्वास आहे.

संस्था वाढीसाठी संचालक मंडळाने सर्वातोपरीने प्रयत्न करत दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजी कोपरखैरणे येथे नवीन शाखा सुरू केली आणि चौक खालापूर येथील स्थानिक लोकांच्या मागणीनुसार दिनांक २० नोव्हेंबर २०१९ मध्ये चौक या ठिकाणी दुसरी नवीन शाखा सुरू केली, सभासदांना कर्ज स्वरूपात अल्प व्याजदराने आर्थिक मदत करत त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आज दोन्ही शाखा अतिशय उत्तम रितीने सुरू आहे...

संस्था स्थापनेपासून आजपर्यंत २९ वर्षात संस्थेने प्रामाणिकपणा, विश्वास, पारदर्शकता आणि सभासद हित या तत्त्वांवर कार्य करत दोन शाखा व मुख्य कार्यालय येथे व्यापारी वर्गामध्ये एक विश्वासार्ह आर्थिक संस्था व फळ व्यापाऱ्यांची संस्था म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

 

संस्थेची मुख्य ध्येय :

सभासदांना सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून त्यांच्या आर्थिक विकासाला चालना देणे आणि सहकाराच्या माध्यमातून व्यापारी वर्ग अधिक सक्षम बनविणे.

 

संस्थेची दृष्टी : 

आधुनिक तंत्रज्ञान, विश्वास आणि सहकार यांचा समन्वय साधत व्यापारी वर्गासाठी आदर्श आर्थिक संस्था म्हणून कार्य करणे.

 

वैशिष्ट्ये :

१) विनम्र, पारदर्शक आणि सुलभ सेवा :

सभासदांना विनम्र, पारदर्शक आणि सहज समजणारी आर्थिक सेवा देण्यावर संस्था विशेष भर देते.

२) सतत ऑडिट वर्ग "अ" प्राप्त संस्था :

संस्थेने सातत्याने ऑडिट वर्ग "अ" प्राप्त करून आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता सिद्ध केली आहे.

३) लाभांश :

संस्थेने स्थापनेपासून सभासदांना १३ % लांभाश देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

४) संपूर्ण संगणकीकरण :

संपूर्ण संगणक प्रणाली मुळे दैनंदिन कामकाज आर्थिक व्यवहार जलदगतीने, सुरक्षित व पारदर्शक पध्दतीने केले जात आहे.

५) एस.एम.एस.द्वारे खाते व व्यवहार माहितीची सुविधा :

सभासदांना एस.एम.एस. सुविधेद्वारे खात्याची व व्यवहारांची तत्काळ आणि अचूक माहिती दिली जाते.

६) प्रशिक्षित, अनुभवी व कार्यक्षम संचालक मंडळ, कर्मचारी व सभासद वर्ग :

प्रशिक्षित व अनुभवी संचालक मंडळ, कर्मचारी आणि जागरूक सभासद संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यरत आहेत.

७) संस्थेच्या वाढीसाठी सभासद, कर्जदार, ठेवीदार व हितचिंतकांचा सक्रिय सहभाग :

संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सभासद, कर्जदार, ठेवीदार आणि हितचिंतकांचा सक्रिय सहभाग असतो.

८) व्यापारी वर्गासाठी विशेष आर्थिक सुविधा :

फळ व्यवसायाशी संबंधित व्यापारी, विक्रेते, लहान उद्योजक आणि सर्वसामान्य सभासदांना बदलत्या आर्थिक परिस्थितीत सभासदांच्या गरजा ओळखून आधुनिक व सुरक्षित आर्थिक सेवा सुविधा देण्याचा संस्थेचा कायम प्रयत्न राहिल.

“विश्वासाचे नाते, आर्थिक विकासाचे वचन.”

सदस्य, ठेवी, कर्ज आणि सेवांमधून घडलेली समृद्धी

२४१६ + एकूण सभासद
२३ + कोटी एकूण ठेवी
११ + कोटी एकूण गुंतवणूक

“बचतीची सवय, समृद्धीची खात्री”

आकड्यांतून सिद्ध झालेली वाटचाल

३३ + कोटी एकूण उलाढाल
२० + कोटी एकूण कर्ज
४३ + कोटी संमिश्र व्यवसाय
स्व. बबनराव दशरथ हांडे

आमची प्रेरणा

स्व. बबनराव दशरथ हांडे

संस्थापक अध्यक्ष

जी फळ व्यापाऱ्यांच्या हृदयात राहत होती, ती एकच मूर्ती होती..
जी सदैव मार्गदर्शन व आपलेपणाची प्रेरणा देत होती..
ती एकच प्रेरणादायी मूर्ती म्हणजेच आपले... बबनशेठ हांडे...

संचालक मंडळ

संचालक मंडळ सन - २०२५ - २६ ते २०२९ - ३०
श्री. राजेंद्र नामदेव नवले
श्री. राजेंद्र नामदेव नवले
अध्यक्ष
सौ. पुष्पावती जीवन हांडे
सौ. पुष्पावती जीवन हांडे
उपाध्यक्षा
श्री. अशोक रामभाऊ हिंगे
श्री. अशोक रामभाऊ हिंगे
संचालक
श्री. रमेश जिजाभाऊ शिंदे
श्री. रमेश जिजाभाऊ शिंदे
संचालक
श्री. सोन्याबापू जनार्दन भुजबळ
श्री. सोन्याबापू जनार्दन भुजबळ
संचालक
श्री. विजय सुरेश म्होप्रेकर
श्री. विजय सुरेश म्होप्रेकर
संचालक
श्री. जीवन बबन हांडे
श्री. जीवन बबन हांडे
संचालक
श्री. श्रीकांत सर्जेराव यादव
श्री. श्रीकांत सर्जेराव यादव
संचालक
श्री. विनायक मुरलीधर भावड
श्री. विनायक मुरलीधर भावड
संचालक
सौ. संध्या ज्ञानेश्वर कुंजीर
सौ. संध्या ज्ञानेश्वर कुंजीर
संचालिका
सौ. सुषमा दाजी माने
सौ. सुषमा दाजी माने
संचालिका
श्री. हरेष वेरोमल वसंदाणी
श्री. हरेष वेरोमल वसंदाणी
तज्ञ संचालक
श्री. मल्हारी महादेव नायकोडी
श्री. मल्हारी महादेव नायकोडी
तज्ञ संचालक
श्री. सुजय चंद्रकांत कुटे
श्री. सुजय चंद्रकांत कुटे
महाव्यवस्थापक

अधिकारी

विश्वासार्ह सेवा, अनुभवी आणि प्रशिक्षित अधिकारी.
श्री. राजू ज्ञानदेव मोरे
श्री. राजू ज्ञानदेव मोरे
शाखाधिकारी
श्री. अनिल शंकर नवले
श्री. अनिल शंकर नवले
शाखाधिकारी
श्री. सुशांत काकासाहेब कदम
श्री. सुशांत काकासाहेब कदम
शाखाधिकारी

कर्मचारी वृंद

विश्वासार्ह सेवा, अनुभवी कर्मचारी.
श्री. अरविंद लक्ष्मण साळुंखे
श्री. अरविंद लक्ष्मण साळुंखे
कर्मचारी
श्री. महेश अशोक खोत
श्री. महेश अशोक खोत
कर्मचारी
श्री. विशाल दिलीप आढाव
श्री. विशाल दिलीप आढाव
कर्मचारी
श्री. संतोष शंकर थोरात
श्री. संतोष शंकर थोरात
कर्मचारी